इमेल मध्ये लेख वाचण्यासाठी येथे नाव नोंदवा


Enter your email address:

Delivered by FeedBurner



जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला जरूर लिहा. माझा पत्ता आहे support@comprolive.com

या साईट मध्ये शोधा

तंत्रज्ञान आणि आपण - भाग 2 Print E-mail
लेख - साप्ताहिक

जगभर तंत्रज्ञाना चा वापर जेवढ्या प्रमाणात होतो त्याच्या किती तरी पट कमी उपयोग आपल्या देशात होतो.  ज्या ठिकाणी शेकडो माणसे काम करू शकतात त्या ठिकाणी एखादे यंत्र त्यांचे संपूर्ण काम करू शकते. शेती कामामध्ये प्रगत देशामध्ये वापरली जाणारी यंत्रे पाहिल्यास याची कल्पना येवू शकते.
यंत्र आणि मानव श्रम यांची  तुलना केल्यास व्यापारी बुद्धीने यंत्र वापरणे हे अधिक सोयीचे वाटू शकते. पण शेवटी हे सारे करायचे कोणासाठी? माणसाने माणसाला उपाशी ठेवून यंत्रावर अवलंबून राहण्यामध्ये कसली माणुसकी.


या साऱ्या बाबींचा गहन विचार केल्यावर यंत्र की माणूस याचे उत्तर शोधणे अवघड जाणार नाही.


ओशो ( रजनीश) यांनी समाजाच्या प्रगतीचा पुढचा टप्पा म्हणून संपूर्ण जगात एकाच सत्तेच्या विचाराला पाठींबा दिला होता. त्यांच्या मते संपूर्ण जगात एक छत्र राज्य / सरकार झाल्यास प्रत्येक देशाला स्वतः च्या रक्षणासाठी वेगळे सैन्य ठेवण्याची गरज राहणार नाही आणि सैन्य व सैनिकी साहित्यावर होणारा खर्च जनतेच्या गरजा भागवण्यासाठी वापरता येवू शकतो. या अशा आदर्श स्थिती मध्ये ओशोंच्या मते यंत्राचा जास्तीत जास्त वापर करून जनतेला शारीरिक कष्टापासून मुक्त करता येयील असा विचार मांडला होता. त्यांच्या मते आज तंत्रज्ञान एवढे प्रगत आहे कि केवळ जगण्यासाठी कोणालाही काम करण्याची गरज नाही. जगातल्या प्रत्येक जीवाची गरज जागतिक स्तरावर यंत्र आणि साधन सामग्रीचे सुयोग्य नियोजन करून भागवले जावू शकते. आणि सरकार जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक गरजा भागविण्यासाठी समर्थ होवू शकते असे ओशोंचे मत होते. आणि जी कामे यंत्रांनी केली जावू शकत नाहीत त्याच कामासाठी मनुष्याने आपले बळ खर्ची करावे असे ओशोना वाटे.


अर्थात असे आदर्श जाग निर्माण होण्यासाठी किती शतके लागतील हे भाकीत करणे कठीण. 

 
तंत्रज्ञान आणि आपण Print E-mail
लेख - साप्ताहिक
आपला देश तांत्रिक दृष्ट्या जगातील इतर प्रगत देशाहून मागासलेला आहे यात कोणाला शंका असण्याचे कारण नाही. अमेरिका आणि युरोपातील बहुतांशी देश आपल्यापेक्षा प्रगत आहेतच, पण चीन, रशिया जपान यासारखे पूर्वेकडील देश देखील तांत्रिक संशोधन, तांत्रिक वस्तूंचे उत्पादन या क्षेत्रांमध्ये आपल्या पेक्षा अधिक प्रगत व विकसित आहेत.

वरील सर्व देशांची नावे पाहिल्यास व त्यामध्ये आपल्या देशाशी तुलना केल्यास आपल्याला हे आढळून येईल कि अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया असे मोजके देश सोडल्यास इतर सर्व देश हे त्या त्या देशातल्या मातृभाषेत सर्व व्यवहार करतात. रशिया ने रशिअन भाषेत मध्ये सर्व तंत्र ज्ञान विकसित केले. चीन ने चीनी भाषेत, जपान ने जपानी भाषेत, त्यामुळे साहजिकच एक असा निष्कर्ष निघू शकतो कि आपल्या मातृभाषेत जर तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण, प्रशिक्षण मिळाल्यास, त्या देशामध्ये तांत्रिक व वैज्ञानिक विकास उत्तम प्रकारे होतो. केवळ भारत व पूर्वी इंग्रजांच्या आधिपत्या खालील काही देशामध्ये हे सर्व इंग्रजी मध्ये केले जाते. व इंग्रजी ही आपल्या देशामधील मातृभाषा नसल्यामुळे आपण तांत्रिक व वैज्ञानिक प्रगतीमध्ये मागे पडलो कि काय अशी शंका निर्माण होते.

अर्थात या साठी इंग्रजांना दोष देण्यास काही अर्थ नाही. आज इंग्रजी ही एक प्रमुख अंतर राष्ट्रीय भाषा म्हणून उदयाला आली आहे. त्यामुळे इंग्रजीचा तिरस्कार करण्यात काही अर्थ नाही. याउलट आपल्याला एका अंतरराष्ट्रीय भाषे मध्ये चांगले प्राविण्य मिळाले याची धन्यता मानून, आपल्याला तांत्रिक प्रगतीचा यापुढचा महत्वाचा  टप्पा पार पाडावयाचा आहे. जे जगातील गैर इंग्रजी भाषिक देशांनी साधले ते आपल्यालाही साधावे लागेल, त्याशिवाय आपण तंत्रज्ञाना वर आपली पकड कधीच बसवू शकणार नाही.
 
सर्व मित्रांना शुभेछ्या Print E-mail
लेख - साप्ताहिक
सर्व मित्रांना माझा नमस्कार. या लेखामध्ये मी आपल्याला माझ्या साईट बद्दल काही माहिती देणार आहे.
comprolive.com हे माझे वेब साईट आहे. यामध्ये वेगवेगळे ब्लॉग आहेत. जर आपल्याला आपल्या कॉम्प्युटर मध्ये शिरलेला व्हायरस काढायचा असेल तर comprolive.com/remove
या नावाचा ब्लॉग आपण वाचावा. तसेच आपल्याला विनामुल्य सोफ्टवेअर शोधायचे असतील तर comprolive.com/free या ब्लॉग वर शोधावे.

तसेच youtube.com/srajure  हा माझ्या यु ट्यूब  चानल चा पत्ता आहे. येथे आपल्याला वरील विषयाचे विडियो पहावयास मिळतील.

मी वरील सर्व विषयामध्ये मागील चार पाच वर्षापासून नियमित लिहीत आलो आहे. मराठीमध्ये तांत्रिक विषया बद्दल माहिती देताना कोठून सुरवात करावी हा प्रश्न पडतो. जर आपल्याला एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर मला तसे कळवावे. आपल्या आवश्यकते प्रमाणे मला लेख लिहिता येतील.  आपण आपले मत This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it या पत्या वर पाठवावे.
 
गुगल वर (SSL ) सिक्युअर सॉकेट लेयर कसे वापरावे. Print E-mail
लेख - गुगल

गुगल वर आपण जेव्हा काही माहिती शोधतो तेव्हा ही माहिती आपल्या संगणकामधून गुगल च्या संगणका पर्यंत जाते आणि तेथून परत येते. आपल्या आणि गुगल च्या संगणका मध्ये जे इतर संगणक असतात, जसे आपल्या नेटवर्क मधील संगणक, किंवा आपल्या इंटरनेट कंपनी (ISP ) चे संगणक, या ठिकाणी जर कोणी मनात आणल्यास आपण गुगल वर काय शोधत आहात हे पाहू शकतो.
अर्थात साधारणपणे असे कोणी करत नाही, किंवा असे करण्याची गरज कोणाला भासत नाही.


पण काही ठिकाणी, किंवा काही परिस्थितीमध्ये गुगल वर माहिती शोधणाऱ्या व्यक्तीस जर आपण गुगल वर काय शोधत आहोत यावर दुसऱ्या कोणाचे लक्ष आहे  असे वाटत असेल तर त्यासाठी गुगल ने  (SSL ) सिक्युअर सॉकेट लेयर वापरून शोधण्याची सुविधा निर्माण केली आहे.
त्यासाठी दोन URL  संकेत स्थळ गुगल तर्फे बनवले गेले आहेत


https://www.google.com
जर तुमचे गुगल वर खाते असेल तर, लॉग इन करून तुम्ही हे संकेत स्थळ वापरू शकता. 


https://encrypted.google.com
जर तुमचे गुगल वर खाते नसेल, किंवा तुम्ही लॉग इन केले नसेल तर तुम्ही हे संकेत स्थळ वापरू शकता.

यामध्ये संगणकामधून इंटरनेट वर पाठवला जाणारा मजकूर सांकेतिक लिपी मध्ये रुपांतरीत करून पाठवला जातो त्यामुळे जर कोणी त्यावर लक्ष ठेवून असेल तर त्यांना हा मजकूर वाचता येत नाही/ समजत नाही . 

 
पत्रातील स्वाक्षरी Print E-mail
इमेल - जीमेल

आपण पत्र पाठवताना टाईप केलेली अक्षरे लिहितो आणि वाचतो. हस्त लिखित पत्र प्रमाणे येथे हस्ताक्षर पाहण्याची सोय नसते. पण जीमेल मध्ये आपण पत्राच्या शेवटी आपली स्वाक्षरी करू शकता.
यासाठी प्रथम पेंट सारख्या प्रोग्राम मध्ये आपली स्वाक्षरी करावी व ती कॉम्प्युटर वर साठवून ठेवावी. हे हस्ताक्षराचे चित्र आपण जीमेल मध्ये पत्राच्या शेवटी जोडू शकता.

 

signature

 
«StartPrev123456789NextEnd»

Page 1 of 9