|
लेख -
साप्ताहिक
|
आपला देश तांत्रिक दृष्ट्या जगातील इतर प्रगत देशाहून मागासलेला आहे यात कोणाला शंका असण्याचे कारण नाही. अमेरिका आणि युरोपातील बहुतांशी देश आपल्यापेक्षा प्रगत आहेतच, पण चीन, रशिया जपान यासारखे पूर्वेकडील देश देखील तांत्रिक संशोधन, तांत्रिक वस्तूंचे उत्पादन या क्षेत्रांमध्ये आपल्या पेक्षा अधिक प्रगत व विकसित आहेत. वरील सर्व देशांची नावे पाहिल्यास व त्यामध्ये आपल्या देशाशी तुलना केल्यास आपल्याला हे आढळून येईल कि अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया असे मोजके देश सोडल्यास इतर सर्व देश हे त्या त्या देशातल्या मातृभाषेत सर्व व्यवहार करतात. रशिया ने रशिअन भाषेत मध्ये सर्व तंत्र ज्ञान विकसित केले. चीन ने चीनी भाषेत, जपान ने जपानी भाषेत, त्यामुळे साहजिकच एक असा निष्कर्ष निघू शकतो कि आपल्या मातृभाषेत जर तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण, प्रशिक्षण मिळाल्यास, त्या देशामध्ये तांत्रिक व वैज्ञानिक विकास उत्तम प्रकारे होतो. केवळ भारत व पूर्वी इंग्रजांच्या आधिपत्या खालील काही देशामध्ये हे सर्व इंग्रजी मध्ये केले जाते. व इंग्रजी ही आपल्या देशामधील मातृभाषा नसल्यामुळे आपण तांत्रिक व वैज्ञानिक प्रगतीमध्ये मागे पडलो कि काय अशी शंका निर्माण होते. अर्थात या साठी इंग्रजांना दोष देण्यास काही अर्थ नाही. आज इंग्रजी ही एक प्रमुख अंतर राष्ट्रीय भाषा म्हणून उदयाला आली आहे. त्यामुळे इंग्रजीचा तिरस्कार करण्यात काही अर्थ नाही. याउलट आपल्याला एका अंतरराष्ट्रीय भाषे मध्ये चांगले प्राविण्य मिळाले याची धन्यता मानून, आपल्याला तांत्रिक प्रगतीचा यापुढचा महत्वाचा टप्पा पार पाडावयाचा आहे. जे जगातील गैर इंग्रजी भाषिक देशांनी साधले ते आपल्यालाही साधावे लागेल, त्याशिवाय आपण तंत्रज्ञाना वर आपली पकड कधीच बसवू शकणार नाही.
Tags:
|