|
लेख -
साप्ताहिक
|
|
जगभर तंत्रज्ञाना चा वापर जेवढ्या प्रमाणात होतो त्याच्या किती तरी पट कमी उपयोग आपल्या देशात होतो. ज्या ठिकाणी शेकडो माणसे काम करू शकतात त्या ठिकाणी एखादे यंत्र त्यांचे संपूर्ण काम करू शकते. शेती कामामध्ये प्रगत देशामध्ये वापरली जाणारी यंत्रे पाहिल्यास याची कल्पना येवू शकते. यंत्र आणि मानव श्रम यांची तुलना केल्यास व्यापारी बुद्धीने यंत्र वापरणे हे अधिक सोयीचे वाटू शकते. पण शेवटी हे सारे करायचे कोणासाठी? माणसाने माणसाला उपाशी ठेवून यंत्रावर अवलंबून राहण्यामध्ये कसली माणुसकी. या साऱ्या बाबींचा गहन विचार केल्यावर यंत्र की माणूस याचे उत्तर शोधणे अवघड जाणार नाही.
ओशो ( रजनीश) यांनी समाजाच्या प्रगतीचा पुढचा टप्पा म्हणून संपूर्ण जगात एकाच सत्तेच्या विचाराला पाठींबा दिला होता. त्यांच्या मते संपूर्ण जगात एक छत्र राज्य / सरकार झाल्यास प्रत्येक देशाला स्वतः च्या रक्षणासाठी वेगळे सैन्य ठेवण्याची गरज राहणार नाही आणि सैन्य व सैनिकी साहित्यावर होणारा खर्च जनतेच्या गरजा भागवण्यासाठी वापरता येवू शकतो. या अशा आदर्श स्थिती मध्ये ओशोंच्या मते यंत्राचा जास्तीत जास्त वापर करून जनतेला शारीरिक कष्टापासून मुक्त करता येयील असा विचार मांडला होता. त्यांच्या मते आज तंत्रज्ञान एवढे प्रगत आहे कि केवळ जगण्यासाठी कोणालाही काम करण्याची गरज नाही. जगातल्या प्रत्येक जीवाची गरज जागतिक स्तरावर यंत्र आणि साधन सामग्रीचे सुयोग्य नियोजन करून भागवले जावू शकते. आणि सरकार जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक गरजा भागविण्यासाठी समर्थ होवू शकते असे ओशोंचे मत होते. आणि जी कामे यंत्रांनी केली जावू शकत नाहीत त्याच कामासाठी मनुष्याने आपले बळ खर्ची करावे असे ओशोना वाटे.
अर्थात असे आदर्श जाग निर्माण होण्यासाठी किती शतके लागतील हे भाकीत करणे कठीण.
Tags:
|